Planets in signs and houses मंगळ दोष , पत्रिका मिलन ( Manglik Dosha , Patrika matching )

मंगळ दोष , पत्रिका मिलन :

अनेक केसेस मध्ये मंगळ दोषाविषयी  लोकांना चुकीचे मार्गदर्शन मिळालेले दिसते . म्हणूनच याविषयी वधू - वरांच्या पालकांसाठी उपयुक्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. मी स्वतः ज्योतिषाची अभ्यासक असून ज्योतिष विषयात ४० वर्षांचा गाढा अभ्यास असलेल्या पुण्यातील जेष्ठ , नावाजलेल्या ज्योतिषी - ज्योतिर्भास्कर सौ. मृणालिनी ठकार यांचे मार्गदर्शन मला मिळत आहे , हे माझे भाग्यच !

अनेक केसेस मध्ये मंगळ आहे सांगून लोकांना चुकीचे सल्ले दिले जातात. चांगली स्थळे हातातून जातात. ज्योतिर्भास्कर सौ. मृणालिनी ठकार या स्वतः अशा गोष्टींमध्ये लक्ष घालून असे सांगणाऱ्या ज्योतिषांशी चर्चा / वेळप्रसंगी कानउघडणी ही करतात. आदिनाथ साळवी यांच्या ब्रह्मलिखित या मासिकच्या त्या सह संपादिका आहेत. त्यांना न ओळखणारा ज्योतिषी विरळाच !

असो, तरी केवळ लोकांच्या हितासाठी काही माहिती देत आहे.

१. मंगळाच्या स्थानी गुरु , शनि , केतू यांसारखे ग्रह असता मंगळ दोष नाहीसा होतो.
२. काही स्थानातील मंगळ  हा पतीच्या सुखासाठी , उत्कर्षासाठी , जातकाच्या धडाडीने काम करण्यासाठी कारणीभूत होतो. या कलियुगात जगताना असा मंगळ हवाच !!
३. केवळ मुलाला / मुलीला मंगळ आहे म्हणून स्थळे नाकारताना आधी स्वतःच्या अपत्याची पत्रिका नीट बघावी . हा मंगळ आणि अपत्याच्या पत्रिकेतील टेक्निकल / सर्जन लाइफ पार्टनर किवा अशा काही गोष्टींचा द्योतक असू शकतो.
४. प्रत्येक पालकाने  : दाते पंचांग २०१३ , पान ११ यावरील मंगळ दोषावरील उतारा अवश्य वाचवा.
५. आताच ३१ गुण जमून देखील ६ महिन्यात घटस्फोट झाल्याची केस आली. कृपा करून केवळ गुण मिलन हा निकष लाऊन २ आयुष्यांशी खेळू नये. मूळ पत्रिकेत वैवाहिक सौख्य कसे आहे , विवाहाचे सप्तम स्थान पाप कार्त्रीत आहे का , वैवाहिक सौख्याचे कारक ग्रह कसे आहेत , आपल्या अपत्याच्या मूळ पत्रिकेत या गोष्टी कशा आहेत , काही दोष जरी असले तरी कोणताच माणूस परिपूर्ण नसतो हे ध्यानी घ्यावे. आपल्या अपेक्षा आणि मूळ पत्रिकेतील तसे ग्रह आहेत का , याचा सारासार विचार करावा. ( उदा. डॉक्टर बायकोसाठी ३५ वर्षे थांबूनही उपयोग होणार नाही , जर पत्रिकेत डॉक्टर बायकोचे योगच नसतील  ! )
६. वाईट योग, दुषित स्थाने शुभ ग्रहांच्या दृष्टीने / नवपंचम वगरे योगांनी दोषमुक्त होत आहेत का ; याचा अभ्यासू ज्योतिषांकडून सल्ला घ्यावा.

७. केवळ १ गोत्र / १ नाड म्हणून नकार देऊ नये . एकनाड दोषासाठी  " नाडीपाद कोष्टक : दाते पंचांग २०१३ : पान क्र. १४ " बघावे. एकाच ओळीत येणारी २ नक्षत्र असतील , तरच दोष मानावा. नाहीतर नाडी चे ८ गुण मिळतात.

केतकी इतराज
९९७०९६६३०४

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...